Showing posts with label श्री मारुतिस्तोत्रं. Show all posts
Showing posts with label श्री मारुतिस्तोत्रं. Show all posts

Saturday, July 3, 2021

श्री मारुतिस्तोत्रं Marutistrotram

 श्री मारुतिस्तोत्रं

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |

वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||||

 

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |

सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||||

 

दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा|

 पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||||

 

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |

 पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||||

 

ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें |

 काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||||

 

ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती |

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||||

 

पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं |

सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||||

 

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |

 चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||||

 

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |

मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||||

 

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |

मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||

 

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |

तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||

 

ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें |

तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

 

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |

 वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||

 

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |

पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

 

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही |

नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

 

हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी |

दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||

 

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |

 रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||

 

॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥

श्री. हनुमानजी यांच्याशी संबंधित पीएच.डी प्रबंधनिवडक ग्रंथविडीओजइतर माहिती स्त्रोत

श्री गणपतीची आरती (Shree Ganesh Aaarti)

  श्री गणपतीची आरती  सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची  |  नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची  |  सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची  |  कंठी झळके माळ म...